न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणा-यांनी मंगळवार दि. ८ मार्च महिला दिनपासून अर्ज करावेत असे आवाहन शहर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे खराळवाडी पिंपरी येथिल कार्यालयात ८ मार्च पासून दुपारी ११ ते २ या वेळेत इच्छुक व्यक्तींनी आपले परिचय पत्र, कार्य अहवाल आणि फोटोसह दोन प्रतीमध्ये अर्ज करावेत असे आवाहन माजी महापौर कविचंद भाट यांनी केले आहे.












