- सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खरात यांचा उपक्रम…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- काळेवाडीत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खरात यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तापकीरनगर, नढेनगर, रहाटणी येथील जवळपास पाचशे नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.
शिबिरातील मोफत चष्मे वाटपासाठी साडेतीनशे वृद्धांनी सहभाग नोंदवला. तर डोळ्यांच्या व इतर शस्रक्रियेसाठी तब्बल ६० जणांनी नाव नोंदवले. कोविडचा पहिला आणि दुसरा डोस १८० जणांनी घेतला.
गोरगरीबांना रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडत नाही. अनेकजणांची उपचाराअभावी कुचंबना होते. त्यामुळे दरवर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून वैद्यकीय प्रतीपुर्तीसाठी मदत केली जात असल्याची माहिती प्रवीण खरात यांनी दिली.












