न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपळे गुरवमध्ये राजकीय धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर आदियाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ६) भाजपमध्ये प्रवेश केला.
फडणवीस हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले. शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर भागाचे २००७ ते १२ या काळात त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.












