न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ फेब्रु.) :- जागतीक कर्करोग दिनानिमीत्त एक दिवसीय कार्यशाळा काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन तर्फे पार पडली. जागतीक कर्करोग दिनाचे औचित्य साधून काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन तर्फे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी डाॅ. माधुरी शिंगाडे (एम.डी मेडीसिन), औषध निरीक्षक भाग्यश्री यादव उपस्थित होते. जागतिक कर्करोग दिनाच्या आयोजित शिबीरामध्ये डाॅ. माधुरी शिंगाडे यांनी कर्करोग होण्याच्या कारणे, लक्षणे व त्यांवर मात कशी करावा याबाबतीत विस्तृत माहिती दिली. तसेच महिलासाठी त्यांना स्तनाच्या व गर्भाशय कर्करोगाविषयी विस्तृत माहिती दिली.
यासाठी काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन मधील महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे आयोजन केमिस्ट असोशिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट चे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी केले होते.











