- बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- खोलीतून उग्र वास येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी बंद दरवाजा उघडला असता आत मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीचा खून झाल्याचे समजते. तरुणीचा मृतदेह बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.
रविवारी (दि. ६) सकाळी आकुर्डीत ही घटना घडली. रितू भालेराव (वय २१, रा. विठ्ठल मंदिराशेजारी, आकुर्डी, मूळ- औरंगाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पतीसह तरुणी परिसरात राहत होती. पती चाकण येथील एका खासगी कंपनीत कामाला असल्याचे सांगत असे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरु होते. आरोपीच्या शोधासाठी जालना, औरंगाबाद येथे पथके रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत .
















