न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरात पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचं उद्घाटन केलं.
यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने आल्याने गोंधळ झाला होता. फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली होती. पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अजय संभाजी पाताडे (रा. पूर्णानगर चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
















