- नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात नियमित होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १०) रोजी बंद राहणार आहे.
गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा नियमित होणार असून त्यानंतर दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवार (दि. ११) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती, सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापरावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.


















