- कोकणे चौकातील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२२) :- पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास स्वतःकडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.
स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेल अशी देखील आरोपीने धमकी दिली. त्या आधारे त्याने स्पा मसाज सेंटरमध्ये पाच हजार रुपये रोख रक्कम, ऑनलाइन माध्यमातून एक हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सोमवारी (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अविनाश शांताराम शिंदे (वय २६, रा. लोहगाव पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल कैलास जोंजाळे (वय २८, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


















