न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकीधारकांना मालिकेतील पसंतीच्या आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी विहित शुल्क भरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी १५ मार्च रोजी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात आवश्यक कागदपत्रे व ‘ डी. वाय. आरटीओ पिंपरी- चिंचवड ‘ यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट जमा करावा.
ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल, अशी माहिती पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.


















