न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२२) :- आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक संजय नेवाळे आणि सत्तेत असूनही पद वाटपात दुर्लक्षित राहिलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आज बुधवारी (दि. ९) रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
या आधी भाजपचे वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी आपल्या पदाचा त्याग करीत राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. आमदारांची हुकूमशाही तसेच भाजपमधील भ्रष्ट कारभाराला वैतागून निष्ठावंत गटातील नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय.


















