- शासकीय कामात अडथळा; दोघेजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण पथक बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान पिंपरीतील शगुन चौक येथील मेनकापड बाजार येथे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले होते. शगुन चौकातील पर्ल कलेक्शन या कपड्याच्या दुकानासमोर कपडे विकण्यासाठी ठेवले होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी त्यावर कायदेशीर कारवाई केली. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखले. आरोपी फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना आरोपींनी धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमित चंद्रकांत पवार (वय ३१) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोदकुमार आशुदमन चंदानी (वय ४८), आशिष विनोद कुमार चंदानी (वय २१), विजय पुरुषोत्तम बलवानी (वय २१, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आशिष आणि विजय यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















