- भोईरनगर येथील ‘न्यू होम मिनिस्टर’ स्पर्धेत महिलांकडून बक्षिसांची लयलूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२२) :- कै. मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या वतीने भोईरनगर, चिंचवड येथिल मनीषा स्मृति निवास येथे ‘न्यू होम मिनिस्टर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सुमारे सहाशे महिलांनी सहभाग घेतला.
”महिलांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी महासंघाच्या वतीने उपक्रम राबविला, अशी माहिती महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण हर्षवर्धन भोईर यांनी दिली.
कार्यक्रमात मधुसूदन ओझा यांनी विविधी खेळ आणि स्पर्धा घेत आपल्या विनोदी शैलीमध्ये धमाल करत रंगत आणली. यावेळी प्रभागातील सुमारे १५ महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात पूनम शंखपाळ (प्रथम), कावेरी दोडमणी (दुसरा) अक्षदा गट्टूवार (तृतीय) यांनी बक्षीसं मिळविली. सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी भोजनव्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी अध्यक्षा वैशाली काळभोर, शिवसेना शहर संघटिका सुलभाताई उबाळे, पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण भोईर, सुरेखा काळभोर, प्रतिभा कंकाळे, नीलम शिंदे, मनीषा शहा, लता चौगुले, रत्ना शेगर, अर्चना बोरसुने, भारती पाटील, मंगळ ढगे, नंदा गांगुर्डे, वैशाली जिंदे, संजीवनी निकाळजे, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड उपस्थित होते.
















