न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२२) :- देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर किती दृढ विश्वास आहे, याचं उत्तर आज पाच राज्यांच्या निकालाने मिळालं. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची दमदार कामगिरी आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी आणि प्रेरणा देणारी आहे.
म्हणूनच आजच्या निकालाचा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार व शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुदळवाडी चिखली या ठिकाणी दिनेश यादव यांच्या संपर्क कार्यालयात सर्व कार्यकर्ते उपस्थित राहुन व सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
आगामी महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा हा सिलसिला सुरु ठेऊ, हा विश्वास आहे. उपस्थित सर्व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले यावेळी सौ पुजाताई महेशदादा लांडगे ह्या उपस्थित होत्या.
















