न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक तसेच दुकानाच्या बाहेर दुकाने मांडलेल्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.
सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग अंधारून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. गेली तीन दिवसांपासून शहरातील वातावरण ढगाळ राहून, विजेच्या कडकडाटासह अवकाळी हजेरी लावण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती.












