- आगीत वस्तू जळून खाक; लॉकरमधील पैशांचीदेखील चोरी…
न्यूज पीसीएमसी नीटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- मोरवाडी येथील सेन्ट्रल मॉलशेजारील रेस्टोरंटमध्ये काम करणाऱ्या कामगार आरोपीने रेस्टोरंटमधील लॉकरमधून ५९ हजार रुपये रोख रक्कम चोरी केली. त्यानंतर केबिनमधील संगणक, फर्निचर आणि कागदपत्रांचे आगीच्या सहाय्याने नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि. १०) पहाटे तीन ते पाच या दरम्यान घडला. रमेश्वर बाळासाहेब तिडके (वय ३३, रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंटी देवनाथ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागारुखा, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.











