न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२२) :- फेब्रुवारी २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. आज १३ मार्च रोजी पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाल संपला आहे.
महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने राज्य सरकारने पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती केली आहे. कार्यकाळ संपल्याने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आपले वाहन पालिकेकडे जमा केले आहे. त्या स्वतःच्या दुचाकीने घरी रवाना झाल्या.
सर्व समिती सभापती, अध्यक्षांनाही पालिकेने दिलेली वाहने जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार त्यांना देण्यात आलेली वाहने पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे.
















