- आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२२) :- थेरगाव येथे रेशनिंगचे धान्य बाजारात चढ्या भावाने विकण्याचा काळाबाजार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
थेरगाव येथील ग्रीन मॅपल सोसायटीजवळ शनिवार (दि. १२) रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण केरभाऊ दळे (वय ३९) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचा चालक बाळासाहेब भास्कर जाधव (वय ३७) आणि क्लिनर कल्पेश दत्तात्रय कापडी (वय ३३, रा. आंबेगाव, पुणे), छोटेलाल राधेश्याम गुप्ता (वय ५७, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच, सूरज (रा. निगडी), राहुल बनसोडे (रा. निगडी), आम्ले (रा. रुपीनगर, निगडी), केंद्रे (रा. यमुनानगर, निगडी) आणि मावळे (नारायणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रेशनिंगचा गहू आणि तांदूळ चढ्या भावाने विक्री करण्यासाठी जवळ बाळगला होता. आरोपींकडून २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३५८ पोती गहू, ६०५ पोती तांदूळ आणि एक ट्रक (एमएच १४ ईएम ४९७९) समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
















