- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे पोलिसांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२२) :- कोणत्याही राजकीय आंदोलनास परवानगी देताना दोन पक्ष समोरासमोर येणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यावी. तसेच आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी हेल्मेट, काठी, जाळी आणि जॅकेट परिधान करावे, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलिसांना दिले.
भाजप नेते किरीट सोमय्या हे शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने शिवसेनेने भाजप कार्यालयावर धडक देत सोमय्यायांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने – सामने आले.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्ण यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना याबाबत आदेश दिले. कोणतेही दोन पक्ष आंदोलनाच्या निमित्ताने समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच आंदोलन किंवा इतर कोणत्याही बंदोबस्ताच्या वेळी पोलिसांनी हेल्मेट, काठी, जाळी आणि जॅकेट सोबत बाळगावे असेही पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत.












