न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२२) :- पिंपळे गुरव येथे ग्राईट रेस्ट्री अलाज नावाच्या हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिला. सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबत माहिती मिळाल्यावर सोमवारी हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईत १५ वेगवेगळे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पाँट, इतर साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हॉटेल चालक प्रसन्न शिवानंद पडेसुर (वय २७, रा. काशिद पार्क, पिंपळे गुरव) आणि हॉटेल मॅनेजर व्यंकटरमन्नीया सुबय्या बोम्मनबोईना (वय ३४, रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.












