न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२२) :- काळेवाडी रहाटणी परिसरातील हरियाली फर्निचरच्या दुकानाला आज मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फर्निचर दुकान अनं दुसऱ्या मजल्यावर नागरिक वास्तव्यास होते.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरातील तिघांना खिडकीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली. महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. या दुर्घटनेत दुकानातील सोफा, गाद्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.


















