न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपीसह एका अल्पवयीन मुलाने घातक शस्त्र तलवार व कोयता जवळ बाळगला होता.
थेरगाव स्मशानभूमी कंपाऊंड वॉल येथे मंगळवारी (दि.१५) गुन्हे शाखा युनिट ४ ने कारवाई केली. आकाश उर्फ गणेश गंगाधर मिसाळ (वय २७, रा. जगताप नगर, थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
















