- पालिकेच्या लसीकरण केंद्रावर CORBEVAX लस उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठयानुसार वय वर्ष १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांना CORBEVAX लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
हा डोस कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ५० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ५० टक्के लाभार्थी पद्धतीने फेण्यात येणार आहे.
तसेच वय वर्षे १४ व पुढील सर्व नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ आणि १८ वर्षावरील लाभार्थांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी या पध्दतीने बुधवार वगळता देण्यात येत आहे.
















