न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजंयती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती निमित्त सोमवारी (दि. २१ मार्च) पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री शिवमुर्तीस दुग्धाभिषेक, ८ वाजता होमहवन व जन्मोत्सव पाळणा, मानकरी महिलांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्मारकापर्यंत भव्य पालखी सोहळा, सायंकाळी ५:३० वाजता शिवराज्याभिषेकाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे जिवंत सादरीकरण आणि सायंकाळी ६ वाजता जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा, यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपारिक वाद्य, ढोल पथक आणि फटाक्यांची आतषबाजी, रात्री १० वाजता महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
शनिवारी आणि रविवारी (दि. १९ आणि २० मार्च) सायंकाळी ६ वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविलेले दिग्दर्शक ॲड. विनय चंद्रकांत घोरपडे लिखित निर्मित आणि दिग्दर्शित ‘ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रि’ हे महानाट्य सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले आहे












