न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.६ फेब्रु.) :- चऱ्होली येथील डॉ. डी. वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. व्यावसायिक शिक्षण व बांधणी-कौशल्य, नावीन्यपूर्ण व उद्योजकता या विषयावर आयोजित परिषदेचे उदघाटन दिनांक ८ रोजी स १० वा लोहगांव जवळ असलेल्या डॉ अजिंक्य डीवायपाटील विद्यापीठात होईल.
यावेळी विद्यापीठातील निबंधक डॉ प्रफुल्ल पवार आणि देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी केले आहे.











