न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.६ फेब्रु.) :- समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मानाची वागणुक देऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजेत, असे लोकनेते व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे धोरण आहे. त्यानुसार समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना सन्मान देऊन, त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी प्रयत्नशील असते. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने रुपीनगर तळवडे येथील रेणुका माता मंदिर परिसरात तृतीयपंथी कुटूंबांसमवेत हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या अडचणीही सांगितल्या. राष्ट्रवादी शहर महिलाध्यक्षा वैशाली काळभोर यांनी देखील त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे तसेच महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ, अरुणा कुंभार, पौर्णिमा पालेकर, वर्षा शेडगे, शाहजादी सय्यद, सुप्रिया पवार, दीपा देशमुख, अनिता पानसरे, मंगल पानसरे, मीनल नवले, अर्चना पवार, प्रेमा शेवाळे, सविता धुमाळ, मेघा उमखकर, निर्मला माने, सुर्वणा सुर्यवंशी, विमल गायकवाड, विद्या शिंदे, मंगल ढगे, सुमन काकडे, संगिता गोडसे, शिल्पा कणेकर, नलिनी भोसले, भाग्यश्री पवार महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.











