- पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास युवसेनेचा आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, गिरिराज हाउसिंग सोसायटी, प्रेमलोक पार्क, दळवीनगर भागत मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणावर अपुरा व अनियमीत व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
या विरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या ‘ ब ‘ प्रभाग पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी माऊली जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, अनंत कोऱ्हाळे, शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष सौंदणकर, शिवसेना विधानसभा समन्वयक वैशाली मराठे, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, महेश कलाल, किरण दळवी, हेमचंद्र जावळे, बाळकृष्ण चिल्ले, किसन शेलार, खामकर, श्रीमंत गिरी, संदीप भालके, राजेश आडसूळ, कुदरत खान, अजित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
















