- २०५ वाहनांवर कारवाई; वाहनचालकांकडून आर्थिक दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ४ ते ६ एप्रिल या कालावधीत फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांच्या तपासणीसाठी मोहीम राबविली यामध्ये ५९७ वाहनांची तपासणी करण्यात आली. फिटनेस सर्टिफिकेट नसणाऱ्या २०५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या २०५ वाहनचालकांकडून ४ लाख १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रिक्षा, टॅक्सी, खासगी बस आणि जड वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते. ज्या वाहन चालकांनी फिटनेस सर्टिफिकेट काढले नाही अशांवर परिवहन विभाग कारवाई करीत असते. वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते. वाहनांचे चेक किती क्षमतेचे असावेत. वाहनांच्या लाइटची प्रखरता किती असावी, व्यावसायिक त्याचबरोबर ट्रॅकवर वाहन कसे चालते, याची तपासणी परिवहन विभागाकडून केली जाते. फिटनेसची तपासणी घेणाऱ्या निरीक्षकांकडून प्रत्यक्षात वाहन चालवून तपासणी घेतली जाते. त्यानंतरच फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीत ४ ते ६ एप्रिल या कालावधीत फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांच्या तपासणीची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ५९७ वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये फिटनेस सर्टिफिकेट नसणाऱ्या २०५ वाहनांवर कारवाई केली. यातून ४ लाख १४ हजार दंड वसूल केला.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…