न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२२) :- दळवीनगर झोपडपट्टी येथील मोकळ्या जागेत आरोपींचे अज्ञात कारणावरून भांडण सुरु होते. फिर्यादी हे भांडणं सोडविण्यासाठी त्याठिकाणी गेले. पोलीस आहे असे सांगूनसुद्धा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना लाथांनी मारहाण केली.
गुरुवारी (दि. १४) ही घटना घडली. पोलीस शिपाई उमेश देवचंद वानखेडे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रितम उर्फ बिक्षु नंदु आवतारे (वय २२, रा. थेरगाव), गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड (वय १९) आणि आकाश शिवाजी आवतारे (वय २० रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
















