- उदघाटनांचा कार्यक्रम टाळून आ. जगतापांची रुग्णालयात जाऊन केली चौकशी..
- जगताप कुटुंबियांना दिला धीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२२) :- चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना पुण्यातील बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज शनिवारी (दि. १६) रोजी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत आमदार जगताप यांची रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
महापालिकेच्या विविध विकास कामांची भुमिपूजने, उद्घाटने शनिवारी (दि. १६) सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. ते रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत जगताप कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल उपस्थित होते. त्यांच्या या कृतीतून पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट संदेश कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला आहे.
आ. जगताप यांच्या प्रकृतीविषयी उलट – सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार जगताप यांनी नुकतेच अमेरिकेमध्ये उपचार घेतले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. घाबरण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी घरीच थांबावे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले होते.


















