न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२२) :- वॉचमनचे काम करत असलेल्या जागेवर आरोपीला काम करायचे होते. यावरून शुक्रवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता दोघांमध्ये भांडण झाले.
या रागातून आरोपीने इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. रावेत येथील कोहीनूर बिल्डिंगच्या मागे शुक्रवारी (दि. १६) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.
बिट्टू यादव उर्फ ऋषीपाल सिंह सुरेंद्र सिंह (वय ४६, रा. इटावा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. संजय दामोदर चौहाण (रा. महु, मध्य प्रदेश) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
















