- स्वहिस्सा रक्कम भरण्यास पुन्हा मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली ४० टक्के आणि बोऱ्हाडेवाडी ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन १८ मेपर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी. अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे – या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. १८ मे पर्यंत लाभार्थ्यांनी स्वाहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
















