- तरुणाचा मृत्यू; मोरवाडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२२) :- कमी भाड्यात टेम्पो दिला नाही याचा राग आरोपीच्या मनात होता. आरोपीने शुक्रवारी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादीने याचा जाब त्याला विचारल्याने चिडलेल्या आरोपीने पाठीत चाकू भोसकला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
रेणुका गुलमोहर सोसायटी, फेज २, मोरवाडी, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. १५) रात्री १०:३० वा हा प्रकार घडला. सोमनाथ प्रकाश कलापुरे (वय २७, रा. मारुती मंदिरासमोर, खराळवाडी, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी प्रतीक प्रकाश पोटघन (रा. मोहननगर, चिंचवड) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक राधेश्याम यादव (वय १९, रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
















