न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२२) :- आरोपींकडे हत्यारे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास मोरे वस्तीतील कृष्णानगर येथील भाजी मंडई येथून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांची झडती घेतली असता एक तलवार व एक चाकू सापडला. लखन ऊर्फ लक्ष्मण बसवराज गाडेकर (वय २४, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), रूपेश प्रमोद ठाकूर (वय २३, रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















