न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- अल्पवयीन मुलाचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला आहे. त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तो मूळचा राजस्थान येथील आहे.
हा प्रकार चिखली येथे रविवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण देवासी (वय ९, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
















