न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत दगड उत्खनन चालू आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्या नंतर क्रशर चालक- मालक यांना जवळपास ७० ते ८० कोटी रुपये एवढा दंड करण्यात आला आहे.
मात्र, हा दंड वसूल न करून घेतल्यामुळे अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करत असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत झालेला दंड वसूल केला जात नाही व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.
















