- सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांची जनसंवाद सभेत मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- शहरातील नागरिक आणि प्रशासन त्यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारीचे निवारण जलदगतीने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये जनसंवाद सभेचे दर सोमवारी आयोजन केले आहे.
त्या अंतर्गत “ग क्षेत्रीय” कार्यालय थेरगाव येथे सोमवारी (दि. १८) रोजी “सारनाथ बुद्धविहार” सिद्धार्थ नगर, रहाटणी, मनपा शाळेजवळ व “बुद्धानंस्मृती विहार” एम एम कॉलेज जवळ थेरगाव याठिकाणी दोन-दोन दिपमाळा बसवण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी दिले आहे.
दरम्यान “ड क्षेत्रीय” कार्यालय रहाटणी या ठिकाणी जगताप डेअरी साई चौकात पीएमपी मार्गावरील बीआरटी मार्गात होणारी खाजगी वाहनांची घुसखोरी आणि अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक फलक स्वयंचलित फाटक, ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची मागणी चाबुकस्वर यांनी केली होती. बीआरटी मार्गामध्ये होणाऱ्या खाजगी वाहनांच्या प्रवेशाला आळा बसणार असून, शहरातील सर्व बीआरटी मार्गावर लवकरच ही स्वयंचलित यंत्रणा पहायला मिळणार आहे. बीआरटी विभाग पीएमपीएमएल व महानगरपालिका यांनी हा विषय मार्गी लावल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
















