न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली फिर्यादी यांनी (MH 14 GU 6377) हा त्यांचा टेम्पो लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्याने हा टेम्पो चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बुधवारी (दि. २०) अंकुशराव लांडगे सभागृहासमोर हा प्रकार घडला. चालक विजयभान देशराज सिंग (वय ३१, रा. भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.