- मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडून इमारतीची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२२) :- नेहरुनगर येथील न्यायालयीन इमारतीतील कामे सध्या ७० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी ठेकेदाराला केल्या आहेत. त्यामुळे आता प्रस्तावित नेहरुनगर येथील इमारतीत नवीन न्यायालय लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख, आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतीच नेहरुनगर न्यायालय इमारतीच्या कामकाजाची पाहणी केली. न्यायालय इमारतीचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त पाटील यांनी मुख्य जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांना दिले आहे. नेहरूनगर येथील प्रस्तावित न्यायालय इमारतीत तळमजला आणि मजले अशी रचना आहे. तळमजल्यावर २ पहिल्या मजल्यावर २ आणि दुसऱ्या मजल्यावर ७ न्यायालये असणार आहेत.
मोरवाडी येथील ५ प्रथम न्यायदंडाधिकारी यांची न्यायालये नेहरुनगर येथील इमारतीत स्थलांतर होणार आहे. तसेच बार असोसिएशनने मागणी केलेली ६ दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालये येथील इमारतीत सुरू होणार आहेत. पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशने केलेल्या पाठपुराव्याबाबत मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी कौतुक केले. पिपरी न्यायालयाचे सर्व न्यायाधीश तसेच पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे, माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, माजी अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे, महाराष्ट्र अॅण्ड गोवा नोटरी असोसिएशनचे पिंपरी – चिंचवड अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, माजी उपाध्यक्ष अॅड. प्रतीक जगताप, पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. गौरव वाळूज, सचिव अॅड. निखिल बोडके, खजिनदार अॅड. अनिल पवार, सदस्य अॅड. मंगेश खराबे, अॅड. महेश मासुळकर, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. संतोषी काळभोर, अॅड. सारिका मोरे, अॅड. ऐश्वर्या शिरसाट आणि वकील वर्ग उपस्थित होता.