न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२२) :- प्रभाग क्रमांक १२ मधील रुपीनगर, अजिंक्यतारा सोसायटी या भागामध्ये ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने (दि. २५) रोजी एकूण १२ अनधिकृत नळजोड बंद केले. मनपाचे थेट नळाला लावलेल्या एकूण ८ विद्युत मोटर्स जप्त केल्या.
या कारवाई पथकामध्ये उप अभि. १, क. अभि. २, मीटर निरिक्षक २, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे ४ कर्मचारी, मनपाचे प्लंबर २, फिटर २, मजूर ४, वायरमन २,अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण २१ जणांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत शहाजी गायकवाड, उप अभियंता, अभय कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, मीनल दोडल, कनिष्ठ अभियंता, फ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने केली. ही कारवाई सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग व कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा फ क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी दिली.
















