- आकुर्डीतील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२२) :- काहीही कारण नसताना आरोपी हा फिर्यादीच्या घरात आला. फिर्यादीच्या घरातील भांडीकुंडी फेकून दिली आणि शिवीगाळ करत फिर्यादीला हाताने मारहाण केली.
याबाबत फिर्यादीचा मुलगा याने आरोपीला जाब विचारला. तू माझ्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण का करतोस, असे फिर्यादीच्या मुलाने आरोपीला विचारले. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांचा मुलगा यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपीने तरुणाच्या कानाला चावा घेतला आणि कानाचा तुकडा पाडला.
ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे रविवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सिरातुल्ला हसमुल्ल टेलर (वय ५५, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इरशाद रफिक सलमानी (वय २२), सौजाद रफिक सलमानी (वय ३२), सदाम शौकतअली सलमानी (वय ३५, रा. आकुर्डी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
















