- भोसरीत मारहाणीची घटना; चौघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२२) :- किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चौघांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करीत धमकी दिली. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय संजय अग्रवाल, संजय ज्वारीमल अग्रवाल व दोन महिला (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांनी सिमेंटचे ब्लॉक, दगड, विटा व लाकडे आमच्या दरवाजात का टाकतो, असे विचारले असता अक्षय शिवीगाळ करू लागला. त्याची आई व बहिणी फिर्यादीचे केस धरून मारहाण करू लागले. त्यावेळी फिर्यादीचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता अक्षय व त्याच्या वडिलांनी सिमेंट ब्लॉक फिर्यादीच्या पतीला मारला. त्यांची झटापट होऊ लागल्याने फिर्यादीमध्ये गेल्या असता संजय अग्रवाल याने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीत मारहाण केली.
त्यांच्याशी अश्लील वर्तन केले, तर अक्षयने फिर्यादीची सोनसाखळी हिसकावून त्यांच्याशी गैरवर्तन केले, सर्वजण मारहाण करून निघून गेल्यानंतर त्याच्या आईने फोनवर ‘ केस मागे घे नाहीतर तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करीन, अशी धमकी दिली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.