न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२२) :- कंपनीचा ई – मेल आयडी हॅक करून ग्राहकांना कंपनीची बदनामी करणारा मजकूर पाठविला. तसेच कंपनीतील व कंपनी सोडून गेलेल्या तब्बल एक हजार १५० कामगारांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाऊंटमधून बाहेर पडत आहेत, अशी चुकीची माहिती दिली.
कुमार भरत लोमटे (वय ३४, रा. रॉयल पार्क, आळंदी रोड, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोमटे याची एसआयएस फॅसिलिटी इंडिया व श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या दोन्ही कंपनीचा ई – मेल आयडी आरोपीने हॅक केला. त्यानंतर लोमटे यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या ग्राहकांना कंपनीची बदनामी करणारा मजकूर पाठविला.
तसेच पीएफ साईटवर जाऊन एसआयएस फॅसिलिटी इंडिया व श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस कंपनीतील कामगार व कंपनी सोडून गेलेले तब्बल एक हजार १५० कामगार यांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाऊंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शवली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


















