न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे एप्रिल २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या एकूण २३ अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार पहिल्या महिला सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, विजयकुमार काळे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, उपलेखापाल अविनाश ढमाले, माजी सहाय्यक आरोग्याधिकारी प्रकाश जवळकर, डी.डी. फुगे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे एप्रिल २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये लेखाधिकारी शिवाजी लोखंडे, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, मुख्याध्यापिका आरेफा शेख, सिस्टर इनचार्ज श्र्वेता गाजूल, वरिष्ठ कोर्ट लिपिक श्रीवास्तव तोडकर, मुख्य लिपिक सुवर्णा केदारी, माणिक शिखरे, स्टाफ नर्स रंजना मेश्राम, ए.एन.एम. उषा पिसाळ, उपशिक्षिका सुरेखा निंबाळकर, संजिवनी ओतारी, ग्रंथपाल दिलीप धायगुडे, वाहनचालक अरविंद घोरपडे, सर्व्हेअर सुहास शिंदे, वीजतंत्री सदानंद राजे, मजूर विश्वास खांदवे, शिवाजी देवकर, गटरकुली मच्छिंद्र सोमवंशी यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये मजूर जनार्दन कोंडे, सफाई कामगार शोभा कंडारे, काशीबाई कांबळे, सफाई सेवक रमीला सोलंकी, गटरकुली फुलचंद वाघचौरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी कले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक मानले.
















