न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- पुणे – आळंदी रस्त्यावरील दिघीतील दत्तनगरमध्ये खासगी जागेत उभारण्यात आलेले होर्डिंग वाऱ्यामुळे टपऱ्यांवर कोसळले. ही घटना शुक्रवारी (दि. २९) घडली. सुदैवाने यावेळी तेथे कोणी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
शहरात पावसाळ्यात होर्डिंग पडून दुर्घटना घडतात. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून वारंवार अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू आहे. दरम्यान, पुणे – आळंदी रस्त्यावर शुक्रवारी एक होर्डिग कोसळले.
खासगी जागेत उभारण्यात आलेले ४० फूट रुंद आणि ४० फूट उंच या आकाराचे हे होर्डिंग उभारण्यात आले होते. मात्र, सुदैवाने यावेळी तेथे कोणी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.