न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे. २०२२) :- महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. लॉजमध्ये अडकवून ठेऊन त्या महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. हिंजवडी पोलिसांनी बुधवारी दुपारी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. ही घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौकाजवळील हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव येथे घडली.
शुभम राजेंद्र ढेरे (वय २८, रा. नेकनूर, ता. जि. बीड), योगेंद्र बाळू कुंभार (वय २७, रा. हिंजवडी), सुनील मदार उर्फ राहुल, उर्फ जीजू, संजीत अमरनाथ सिंग, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम आणि योगेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.