- चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून १६.०५ तोळे सोन्याचे दागिने, २.५ किलो चांदीची भांडी आणि देवाचे चांदीचे दागिने, असा एकूण पाच लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना चिंचवडगावातील केशवनगर शाळेजवळ शनिवारी (दि. २१) सायंकाळी पाच ते रविवारी (दि. २२) सकाळी सव्वासात या कालावधीत फिर्यादी हे त्यांच्या भावाच्या घरी पुण्यात गेले असता घडली.
विवेक विष्णूपंत मुद्देबिहाळकर (वय ५९, रा. साई साठे पार्क, केशनगर शाळेजवळ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.