न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- ”मला तुझाशी काही बोलायचे आहे”, असे आरोपी तरुणीला म्हणाला. यानंतर आरोपीने फिर्यादी यांना गाडीवर बसवून मारूंजी कोलते पाटील येथील राहत्या घरी घेऊन गेला. त्यानंतर कोल्ड्रीक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले.
फिर्यादी यांच्या इच्छेविरूध्द शारीरीक संबंध ठेवले. त्यांनतर फिर्यादी यांना घरातून जाण्यास मज्जाव केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २३ ) दुपारी १ ते ५ या कालावधीत मारूंजी कोलते पाटील, ता मुळशी येथे घडला.
महिलेने गुरूवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम विनायक बने (वय १९) रा. रत्नागिरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.