न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- महापालिकेच्या शहरातील सार्वजनिक उद्यानासाठी एकूण ५२ माळी १२ महिने कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांना दरमहा २५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
महापालिकेची सर्व उद्याने ठेकेदार पद्धतीने चालविली जातात. स्वच्छ व सुंदर पिंपरी – चिंचवड शहर करण्यासाठी पालिकेने स्वतः उद्यानाची देखभाल करण्याचा निर्णय घेतला होता. टप्पाटप्पाने सर्व उद्यानाची देखभाल पालिका स्वतः करीत आहे. त्यासाठी पालिकेने मानधनावर ५२ माळी सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्त केले होते. त्यांना दरमहा २२ हजार ८२० रुपये एकत्रित मानधन देण्यात आले. तसेच, त्यांना एक महिन्याची मुदतवाढ ही देण्यात आली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे प्रशिक्षणार्थी माळी उपलब्ध करून देण्याची विनंती पालिकेने केली होती. विद्यापीठाने ७० विद्यार्थ्यांची यादी पालिकेस ४ मे रोजी मेलद्वारे दिली आहे. उद्यान विभागाची ५२ माळी पदाची मागणी केली आहे. त्यानुसार ५२ माळी १२ महिने कालावधीसाठी नेमण्यात येणार आहेत. त्यांना दरमहा २५ हजार विद्यावेतन दिले जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.