न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- तक्रारदाराच्या भावाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला आहे. तसेच तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नीचे पोस्टमार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली. मात्र, एएसआयने तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी तडजोड करून २५ हजार रुपये देण्याचे ठरवले.
दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे याप्रकरणी तक्रार केली. तडजोड केलेल्या लाच रकमेतील पाच हजार रुपये बुधवारी देण्याचे ठरले. वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत ही लाच देण्यात येणार असल्याने एसीबीने पोलीस चौकीत सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये अॅडव्हान्स लाच घेताना आरोपी एएसआय एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला.
हा प्रकार बुधवारी (दि. २५) रोजी घडला. ३६ वर्षीय व्यक्तीने चिचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विठ्ठल अंबाजी शिंगे (वय ५७) असे लाच घेतलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबी युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.