- रोख रक्कम अनं कागदपत्रांची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२२) :- पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे बँक ऑफ बडोदाच्या समोर फिर्यादी यांनी कार पार्क केली होती. भर दिवसा दुपारी बारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या कारची एक काच फोडली.
त्यानंतर कारमधून बँकेची कागदपत्रे, फिर्यादी यांच्या पत्नीचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र आणि अंदाजे एक लाख ९० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. २६) दुपारी बारा वाजता घडला.
विजयकुमार निळोबा मुंडकर (वय ५५, रा. मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.